निळ्या पाखरांची माय लिरिक्स (मराठी-हिंदी) - अनिरुद्ध वनकर Lyrics
Singer | अनिरुद्ध वनकर |
Singer | भुपेश सावई, विकास भोरकर |
Music | भुपेश सावई, विकास भोरकर |
Lyrics | अरविंद वानखेडे |
तळमळते आज रडते निळया पाखरांची माय
तळमळते आज रडते निळया पाखरांची माय (3)
उपाशी पिल्यासाठी,हिंडायची रानोमाळ
चोचीत आनुनिया...भरवायची जीवापाड
वाचलेलं खायी थोडं हो हो हो.....(2)
तशीच झोपी जाय, तशीच झोपी जाय.....
पाखरांची ही माय,पाखरांची ही माय..
निळ्या पाखरांची माय....
तळमळते आज रडते निळया पाखरांची माय
भिजलेल्या आसवांची माय तुलाच किव
या कोटी यातनांना दिले तू नवे जीव
रंजलेल्या या युगाची...हो हो हो
रंजलेल्या या युगाची, तूच पंख झाली पाय...(2)
पाखरांची ही माय.....निळ्या पाखरांची माय
तळमळते आज रडते निळया पाखरांची माय
दिन रात जागुनिया विसरे तहान भूख
जुलमी युगास जाळुन मिळवून दिले सुख
अशी लाखामधी एक.....हो हो हो (2)
आली उजळुनी सकाळ, उजळुनी सकाळ (2)
पाखरांची ही माय पाखरांची ही माय
निळ्या पाखरांची माय...
तळमळते आज रडते निळया पाखरांची माय
नाही जायाची थकून ती गवऱ्या थापून
हीच लई मोठं मन यान शिवून शिवून
तहानेनं कासाविस धारा घामांच्या पिऊन
माय सांझच्या वेळेले मोळी डोईवर घेऊन
इथे जळायची मोळी तिथे पेटायची चूल
मायेनं रांधलेलं देते खायाले ढासलं
सारा गांव निजे तव्हा हो हो हो.....(2)
आमच्या पोटामधी जाय...पोटामधी जाय
अशी होती माझी माय,निळ्या पांगळ्या तू पाय
निळ्या पाखरांची माय..
तळमळते आज रडते निळया पाखरांची माय...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें
If you have any doubt , please let me know