सीधे मुख्य सामग्री पर जाएं

भीमाला सलामी कव्वाली - Bhimala salami qawwali lyrics in Hindi/marathi

 

भीमाला सलामी कव्वाली - Bhimala salami qawwali lyrics in Marathi/Hindi - Bhim geete राहुल साठे Lyrics


Bhimala salami qawwali lyrics in hindi marathi

Song Details in Hindi / Marathi


Singer
राहुल साठे
Composer
राहुल साठे
Music मास्टर सलीम जी
Lyrics.                  सुनील खरे


Songs details in English

Song                      Bhimala salami qawwali

Singer                   Rahul sathe

Composer            Rahul sathe

Music                    Master saleem ji

Lyrics                    Sunil Khare


भीमाला सलामी कव्वाली यह भीमगीत सुनील खरे द्वारा लिखा गया है। इसे राहुल साठे द्वारा कंपोज़ एवं गाया गया है। इसे संगीत मास्टर सलीम जी द्वारा दिया गया है। 


जर स्वतःचा विचार केला असता
तर गावा-गावांत बंगला बांधून ठेवला असता
जर...धनाची आशा केली असती भीमाने
तर....तिजोरीत पैसा भवला नसता..
समाज क्रांती सोडुन....
सुनील जर धनाला हात लावला असता
तर.... माझ्या भिमान
सोन्याची टाय अन सोन्याचा कोट शिवला असता...

एकंच झटला
पेटून उठला
माझ्या भीमावाणी
नेता न कुठला
एकंच झटला
पेटून उठला
माझ्या भीमावाणी
नेता न कुठला
भले भले ते पुढारी करतात
भीमाला सलामी..
भले भले ते पुढारी करतात
भीमाला सलामी..
(कोरस - भले भले ते पुढारी करतात
भीमाला सलामी)
जय जयभीम......

रुढीशी टक्कर घेऊन
आला तो एकटा धावून
दिन दुबळ्याना ताराया
झटला उपाशी राहून
ऊन पाऊस अन वारा
केली न त्याने परवा
मायेनं पंखाखाली
घेतले हो त्याने सर्वा
एकटाच राबला
दिन रात जागला
हक्का साठी रणांत झुंजला
धम्म जयाने लाविला
या दलितांच्या कामी
भले भले ते पुढारी करतात
भीमाला सलामी....

कुणीच नसतांना संग
केली रुढीशी ती जंग
क्रांती भिमाची पाहून
भले भले झाले दंग
टप् टप् गाळून घाम
केलं भिमान काम
जातीवादी सारे
एकट्याने केलेत जाम
कधी ना हारला
माघार सरला
वाघावानी, सदैव फिरला
भिमान घालवली ती सारी
रुढीची गुलामी
भले भले ते पुढारी करतात
भीमाला सलामी....

कित्येक झाले पुढारी ते
लाखो नी नामधारी ते
साऱ्या पुढाऱ्यांना माझे
भीमराव एकटेच भारी ते
माय- पित्याच्या वाणी
लावून गेले माया
दिन दुबळे हे म्हणती
बाप आमचा भीमराया
सुनील वाणी लिहतात गाणी
राहुल गायी गोड मुखानी
बुद्ध विहारी रोज म्हणतो
पंचशीला मी
भले भले ते पुढारी करतात
भीमाला सलामी...








टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MI WADAL WARA LYRICS IN MARATHI

 मी वादळ वारा लिरिक्स भिम गीत मराठी (अनिरुद्ध वनकर) मी वादळ वारा - अनिरुद्ध वनकर Lyrics Singer    अनिरुद्ध वनकर Music    वामनदादा कर्डक Lyrica    वामनदादा कर्डक मी वादळ वारा खोपी कुपी सोडून साऱ्या माळ्या लोळवणाऱ्या मी वादळ वारा, मी वादळ वारा मी तथागताची वाणी,मी जोतीबाची गाणी मी क्रांतीचा नारा नारा मी क्रांतीचा नारा ------ २ मी वादळ वारा.... मी भिम युगाचा बेटा मी भिम युगाचा रेटा विषमतेला खारा तिथे जातो माझा भारा मी वादळ वारा..... मी वामन वाणी गातो मी वामन वाणी गातो जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्याच्या चारा मी वादळ वारा.....

NILYA PAKHRANCHI MAAY LYRICS IN HINDI/MARATHI

  निळ्या पाखरांची माय लिरिक्स (मराठी-हिंदी) - अनिरुद्ध वनकर Lyrics Singer अनिरुद्ध वनकर Singer भुपेश सावई, विकास भोरकर Music भुपेश सावई, विकास भोरकर Lyrics          अरविंद वानखेडे तळमळते आज रडते निळया पाखरांची माय तळमळते आज रडते निळया पाखरांची माय (3) उपाशी पिल्यासाठी,हिंडायची रानोमाळ चोचीत आनुनिया...भरवायची जीवापाड वाचलेलं खायी थोडं हो हो हो.....(2) तशीच झोपी जाय, तशीच झोपी जाय..... पाखरांची ही माय,पाखरांची ही माय.. निळ्या पाखरांची माय.... तळमळते आज रडते निळया पाखरांची माय भिजलेल्या आसवांची माय तुलाच किव या कोटी यातनांना दिले तू नवे जीव रंजलेल्या या युगाची...हो हो हो रंजलेल्या या युगाची, तूच पंख झाली पाय...(2) पाखरांची ही माय.....निळ्या पाखरांची माय तळमळते आज रडते निळया पाखरांची माय दिन रात जागुनिया विसरे तहान भूख जुलमी युगास जाळुन मिळवून दिले सुख अशी लाखामधी एक.....हो हो हो (2) आली उजळुनी सकाळ, उजळुनी सकाळ (2) पाखरांची ही माय पाखरांची ही माय निळ्या पाखरांची माय... तळमळते आज रडते निळया पाखरांची माय नाही जायाची ...