NILYA TOPIWALE BHIM GEETE LYRICS IN MARATHI/HINDI - - Lyrics
Singer | - |
Singer | - |
Music | - |
Song Writer | - |
अहो निळ्या टोपीवाले
निळ्या निळ्या फेटेवाले
तुमचा उद्धार असा झाला की
दंड ठोकुनी जयभीम तुम्ही बोला की ।।धृ।।
थोडी इंग्रजी तुम्ही हो शिकले
शिकले पण थोडेच रुकले
स्वाभिमान कुठे गेला,माझ्या भिमान दिलेला
काळ विषमतेचा गेला की..
दंड ठोकुनी जयभीम तुम्ही बोला की ।।१।।
दिली फिराया भीमाने गाडी
ऐश आराम बंगला माडी
आता जाणीव ठेवा,अशी आयती रिकामी
थोडे पायीं तरी चाला की..
दंड ठोकुनी जयभीम तुम्ही बोला की ।।२।।
भीम कार्याला जाणत नाही
त्याला समाज मानत नाही
किती आले किती गेले,नाही सार्थक झाले
झोपू नका डोळे खोला की..
दंड ठोकुनी जयभीम तुम्ही बोला की ।।३।।
उगीच कशाला हेवा देवा
अर्थ जयभीम चा समजून घ्यावा की
भिमामुळे मोठेपणा,तुम्ही स्वाभिमानी बना
दत्ता निळा टिळा लावा की..
दंड ठोकुनी जयभीम तुम्ही बोला की ।।४।।
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें
If you have any doubt , please let me know